ढाणकी प्रभाग 12 येथील सी सी रस्त्याचे काम निकृष्ट ग्रामस्थांनी रोखले रस्त्याचे निकृष्ट काम... (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी)ढाणकी परिसरातील प्रभाग 12 येथे समा भाई ते बाबुळकर यांच्या घरापर्यंत सी सी रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने अभियंता यांच्या उपस्थित हे काम चालू आहे. सदर सीसी रस्ता चे काम चिखलाच्या रस्त्यावरच कमी प्रमाणात सिमेंट मिश्रित गीटीचा थर टाकून त्यावर बांधकाम सीसी रस्ता बनवण्यात येत असल्याने नागरिकांनी ओरड सुरू केली असूनही सदर रस्ता बंद करा काम करू नका,चांगल्या दर्जा चे काम करा सिमेंट टाकून बांधकाम करा अशी नागरिकांनी सांगितले. रस्ता चे बांधकाम हे चिखलावर होत आहे रस्ता दबून काही दिवसात फुटून जाईल असे सांगितल्याने रोड अभियंता यांनी दुर्लक्ष केले व काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार यांना सांगितले त्यामुळे येथील नागरिक यांनी काम बंद पाडले आहे. प्रभाग 12 मधील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचा काम होत असल्याने येथील नागरिकानी काम उत्कृष्ट पद्धतिने करत असेल तरच काम चालू करा म्हणून रोड काम थांबविले. या बंद रोडचे काम चांगल्या दर्जाचे बांधकाम विभाग करतील का? यावर ठेकेदार यांची कान उघडणी करणार का? या कडे ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.चौकट :सुधाकर बाबुळकर काँग्रेस पक्ष ढाणकी सचिव यांनी अभियंता कत्तूलवाड यांना सांगितलं असता ठेकेदार हा अल्प प्रमाणात सिमेंट वापरून मटेरियल चा रेशीओ चे प्रमाण बिगडऊन रोड निकृष्ट पदतीने करत असल्यामुळे काम बंद करा असे सांगितले व चांगल्या दर्जा चे काम करा पण अभियंता यांनी यांना हसायस्पद उत्तर देत म्हणत आहे की,ठेकेदार माझं ऐकत नाही तुम्ही वरिष्ठ अभियंता यांना फोन करून काम बंद करण्यासाठी सांगा.यावर वरिष्ठ अभियंता यांना फोन केले असता अभियंता यांनी ठेकेदार यांना सांगून काम चांगल्या दर्जाचे करण्यास सांगतो म्हणून सांगितले.

Previous Post Next Post