राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या जिल्हा दौऱ्यावर.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या हे 18 व 19 जुलै रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. प्रशासनाकडून त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व तयारीला वेग आला आहे. श्री. आर्या यांचे 18 जुलै रोजी सेंधवा (मध्यप्रदेश) येथून खेतिया, शहादामार्गे नंदुरबार येथे दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृहावर आगमन होणार आहे. दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील आदिवासी बांधव, आदिवासी संस्था, संघटनांशी ते विविध मुद्दे व समस्यांवर बैठक घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी 19 जुलैला सकाळी 11 वाजता रहिवासी समस्यांबाबत आदिवासी संस्था व संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. तर दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्ह्यातील दोन्ही विभागांचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा वन अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांचे जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजेनंतर पुन्हा ते सेंधवाकडे प्रयाण करणार आहेत. या दौऱ्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी समन्वय अधिकारी म्हणून नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, प्रभात गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post Next Post