ढाणकीमध्ये पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, ये-जा करणे कठीण, सर्वसामान्यांचे बेहाल? (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी)पाणीपुरवठा वाल साठी खोदलेले खड्डे व चिखल रस्त्यामुळे पावसाळ्यात रस्ते अपघाती ठरले आहेत. शहरात असा एकही रस्ता नाही जिथे या रस्त्यांचा लोकांना त्रास होत नसेल. सिमेंट रस्ते झाले तिथे ठेकेदारांची मनमानी मूळे निकृष्ट बनवलेले रस्ते सहा महिन्यात कमकुवत होऊन खड्डे पडले आहे. त्यामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहे. प्रभाग क्रमांक 16,17 व अन्य प्रभागा मध्ये रस्ता पूर्णपणे चिखल मय झाले आहे. वाहनचालकांना होणारा त्रास ,पायी चालणारे नागरिक यांना काही दिलासा मिळत नाही. लोकसभा व विधानसभा आल्यावरच कामे जलदगतीने होतात, असे लोकांचे म्हणणे आहे. यानंतर नेत्यांना सर्वसामान्यांच्या समस्यांशी काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रभागातील काही रस्त्याचीही दुरवस्था होती, मात्र लोकसभा आल्यानंतर खासदार निधीतून रस्त्याची कामे करण्यात आली. पण अजूनही प्रभागात काही रस्त्यात चिखल आणि मोठे खड्डे पडलेले आहे . लोकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे . या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे , मात्र नगरपंचायत, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्याला तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous Post Next Post