उत्कर्ष विद्यालयात पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. .(.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी) . सेलू:- (ता. 17) रोजी येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदाया तील महत्वाचा दिवस म्हणजे 'आषाढी एकादशी' त्या निमित्त (ता.१७) वार बुधवार रोजी उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्कर्ष विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी शिक्षक पारंपारिक वारकऱ्याची वेशभूषा परिधान करून शाळेच्या परिसरातून आकर्षक फुलांनी व सजवलेली पालखी मिरवणूक काढली. पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला .याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे सर तसेच शाळेचे मुख्या ध्यापक कैलास ताठे सर जिज्ञासा बालविहारच्या शिंदे मॅडम तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ परळीकर मॅडम व टाके सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आज साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुराया च्या दर्शनासाठी भाविक वारकरी हे पंढरपूरला रवाना होतात. दरम्यान या उत्साहावर्धक वातावरणात संस्कारक्षम नवीन पिढी घडवणाऱ्या सेलूतील उत्कर्ष विद्यालयातील मुलांनी , अभंग, गवळणी, व भारुडाच्या माध्यमातून वृक्ष रोपणाचा संदेश दिला. श्रीराम प्रतिष्ठान ही संस्था केवळ गुणवत्ता शिक्षण देऊनच थांबत नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे देखील पाहिले जाते. यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल म्हणून आयोजित केले जातात व हे कार्यक्रम यशस्वी व्हावे यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी शिक्षक परिश्रम घेत असतात.
byMEDIA POLICE TIME
-
0