जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याची दुरावस्था ; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष... (अतिश वटाणे तालुका प्रतिनिधी उमरखेड) बाळदी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांना खूप मोठ्या काटकसरीने ये जा कराव लागत आहे. बाळदी ते पिरंजी या रस्त्याला लागूनच हा रस्ता असल्यामुळे तांड्यातील खालच्या वस्तीतील महत्त्वाचा रस्ता आहे.शेतात मजूर याच रस्त्याने येणे जाणे करत असतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नेहमी तिथे पाणी साचत असते तरी गावातील ग्रामपंचायत ही जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे असे गावातील लोकांकडून ऐकायला मिळत आहे. मागच्या वर्षी आर्धी गाडी खडक टाकून काम भागवलं असं किती दिवस चालणार हा रस्ता कधी होणार ? असा प्रश्न गावातील लोकांना पडत आहे. शाळेला लागूनच अंगणवाडी असल्यामुळे लहान मुलांना जाणे अवघड झाले आहे व शिक्षक लोकांना दोन चाकी वाहन घेऊन जाणे पण अवघड झाले आहे. तसेच खालच्या वस्तीसाठी महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे दोन चाकी वाहन त्या रस्त्याने चालवणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गावातील लोकांकडून होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0