*ऐनपूर येथील सरदार पटेल प्राथमिक विद्यामंदीरात वृक्षारोपण🌳* (रावेर - प्रतिनिधी. दि.22 विनायक जहुरे )रावेर तालुक्यातील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक व शहीद चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शाळेचे संचालक एन.व्ही.पाटील व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने,व्यवस्थापक आर.टी.महाजन व मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी शाळेच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारची एकूण २० रोपे लावली.त्यात फुलझाडे व चिंच,आवळा,पेरू,कडुलिंब,वड,जांभूळ अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. सजीवसृष्टी बाबत झाडांचे महत्व लक्षात घेता झाडांचे संगोपन करण्याचे एन.व्ही.पाटील यांनी विद्यार्थांना माहिती दिली.व विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे ठरविले.तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

Previous Post Next Post