पदाधिकारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करून जनतेची कामे केल्याशिवाय अधिकाऱ्यांवर तुमचा प्रभाव पडणार नाही : ॲड.जयप्रकाश बाविस्कर .(यावल विभागीय संपादक सुरेश पाटील)दि.२३ गाव तेथे शाखा उद्घाटन करून टीपदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी निर्माण करून जनतेची कामे केल्याशिवाय तुमचा म्हणजे मनसेचा अधिकाऱ्यांवर प्रभाव पडणार नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. शनिवार दि. १९ जुलै २०२४ रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती, बैठकीच्या सुरुवातीला प्रभारी राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर,रावेर व चोपडा विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे यांचा पक्षातील अल्प कामकाजाचा कडक आणि स्पष्ट शब्दात आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना देऊन शुक्रवार बाजाराच्या दिवशी नागरिकांचा संपर्क जास्तीत जास्त होण्यासाठी दुपारच्या वेळेस वेळ काढून एका ठिकाणी थांबून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच गाव तिथे शाखा उद्घाटन करून पदाधिकारी कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी निर्माण करा अशा महत्त्वाच्या सूचना मनसेचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी सदस्य तथा आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या. बैठकीत संजय नन्नवरे,भगवान कोळी,संतोषभाऊ जवरे,दिलीप कोळी, युवराज कोळी,गौरांग मराठे,प्रसन्न नाईक, रमेश वानखेडे,किशोर लावणे,के.के.कोळी मोहसीन खान, कल्पेश पवार ज्ञानेश्वर कोळी पद्माकर कोळी शुभम सोनवणे सागर कुंभार पंकज तावडे दिलीप कोळी योगेश ठाकरे किरण भोई एकनाथ कोळी निलेश भोई,चेतन अढळकर,किशोर नन्नवरे,गौरव कोळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0