भर पावसात काँग्रेसच्या वतीने नगरपंचायत वर शहरातील अनेक समस्यावर आक्रोश मोर्चा... (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी ) दि23जुलै मंगळवार रोजी काँग्रेसच्या वतीने शहरातील आठवडी बाजार येथून समस्त गावकरी व काँग्रेसच्या वतीने वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा वळविण्यात आला. मोर्चात येते वेळी महापुरुषांना अभिवादन करून माला अर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत च्या घरकुलाचा पहिला हप्ता त्वरित देण्यात यावा , अनेक गोरगरीबाचे संसार उघड्यावर आहेत. 572 घरकुल मंजूर झालेले असून अद्याप घरकुलाचा हप्ता मिळालेला नाही. तो हप्ता त्वरित देण्यात यावा. तसेच शहरामध्ये अनेक समस्या आहेत, त्यात मुत्री घराची समस्या, कर वाढ , व शहरांमध्ये पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी नाही. शहरात कमीत कमी आठ दिवसाला पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा विविध समस्येचा पाढा वाचण्यात आला. या सर्व मागण्या होत असताना काँग्रेसच्या वतीने जोपर्यंत सिवो येणार नाहीत तो तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू राहील . अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सिवो साहेब आले परंतु कोणत्याही समस्येचे समाधान न झाल्यामुळे . मोर्चा हा थेट नगरपंचायत कडे वळवण्यात आला. मोर्चा नगरपंचायत कडे गेल्यानंतर सिवो साहेबांनी घरकुलधारकांनी पहिले स्वतःच्या पैशाने खड्डे करण्यात यावे व तद नंतर चाळीस हजार रुपये पहिला हप्ता देण्यात येईल. तसेच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित मागण्यांचा प्रस्ताव मांडू असे सिवो साहेबांनी सांगितले व आम्हाला आठ दिवसाचा अवधी देण्यात यावा, जेणेकरून आम्ही शहरातील समस्यांचे निवारण करू असे उत्तर मिळाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने मोर्चाला स्थगिती देण्यात आली. यावेळी माझी कृषी उत्पन्न समिती बाळासाहेब चंद्रे पाटील, काँग्रेस ढाणकी शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, बंटी वाळके, गजानन मिटकरे,अजित खा पठाण, हमीद ठेकेदार, रुपेश भंडारी ,किशोर ठाकूर, बाबुराव नरवाडे, दत्ता हाके, वामन मुनेश्वर, खंडेराव लकडे, व शहरातील नागरिक उपस्थित होते.चौकटशहरांमध्ये अनेक समस्या असून नगरपंचायत झाली तेव्हापासून कोणतेही काम यशस्वीरित्या पार पडले नाही. शहरात घरकुलाची समस्या, मुत्रीघराची समस्या, रस्त्याची समस्या,पिण्याच्या पाण्याची अशा अनेक समस्यांचे माहेरघर म्हणून ढाणकी ची ख्याती आहे. या लहानसहान बाबी सुद्धा नगरपंचायत पूर्ण करू शकत नाही. नगरपंचायत नुसती कर वसुलीसाठीच का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीवो साहेबांनी खड्डे झाल्यानंतर चाळीस हजार रुपये देण्याचे मंजूर केले असून. शहरातील समस्या वरिष्ठाकडे मांडून आम्ही समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू असे उत्तर मिळाले असून तोपर्यंत आंदोलन स्थगित झाले असून अद्याप लढा संपलेल्या नसून आठ दिवसानंतर शरीरातील समस्या चे निराकरण झाले नसल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. मा .जी कृषी उत्पन्न बाजार समिती बाळासाहेब चंद्रे पाटील

Previous Post Next Post