शिक्षण सप्ताह अंतर्गत सहाव्या दिवशी वृक्षा रोपण व संगोपन कार्यक्रम संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी )परभणी. मोरया प्रतिष्ठान सेलू व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू यांच्या संयुक्त उपक्रम.सेलू : दि. 27 जुलै 2024 सेलू शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत आज सहाव्या दिवशी भव्य अशा वृक्षारोपण व वृक्ष संगोपन कार्यक्र माचे आयोजन केले गेले. यावेळी व्यासपी ठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता वेडे, गृहप्रमुख श्रीमती प्रेरणा पवार मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर, सदाशिव बर्वे आणि सुजित मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुनि ता वेडे यांनी केले. उप स्थित 150 विद्यार्थिनि ना मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी वृक्ष संवर्धनाची व संगोप नाची शपथ दिली. यावेळी उपस्थित पालकांचा देशी वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक मूल एक झाड हा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक पांडुरंग पाटण कर यांनी केले. तर आभार सुहास नवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह शिक्षिका श्रीमती सुमि त्रा पवार ,श्रीमती अश्वि नी बोराडे, श्रीमती वन देवी वाघमारे, श्रीमती योजना कातकडे , श्रीमती शितल अव चार, श्रीमती बेबी केंद्रे श्रीमती सुजाता सेलू कर , श्रीमती अनुसया शिंदे,श्रीमती आम्रपाली कांबळे , रावसाहेब पदमपल्ले आदींनी पुढाकार घेतला.
byMEDIA POLICE TIME
-
0