"जळगावच्या सदगुरू विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप " सदगुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे सचिव तसेच संस्थाचालक प्रा.डॉ.श्री. नारायण शंकर खडके तसेच बन्सी माळी (राष्ट्रीय खेळाडू)मुख्याध्यापक गायत्री भंगाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.इ.१ली ते ७वी च्या एकूण २५२ विद्यार्थ्यांना मान्यवराचा हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले.याप्रसंगी गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन व भूषण जोगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुनम चौधरी,शिल्पा झोपे,जावेद तडवी,सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

"जळगावच्या सदगुरू विद्यालयात  शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप "                                                    
Previous Post Next Post