प्रदेशाध्यक्ष पदासाठी चौघांचे भवितव्य मेल बंद (मुंबई प्रतिनिधी)व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद झाले आहे. गेल्या एक महिनाभरापासून व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक गाजत होती. याचे मतदान आज 28 जुलै रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पार पडले. या निवडणुकीमध्ये राज्यातील साप्ताहिक विभागाचे सदस्यांचा मतदार म्हणून समावेश होता. यात ८० टक्के जणांनी सहभाग नोंदवला. व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी वामन पाठक लातूर, रोहित जाधव सांगली, अब्दुल कय्यूम छत्रपती संभाजी नगर, आणि विनोद बागडी जालना यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपली निवड व्हावी यासाठी चौघांनीही आपली शक्ती पणाला लावली होती. प्रत्येक उमेदवाराने मतदारापर्यंत पोहोचून आपली भूमिका सांगितली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठीची निवड पाच ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार कलकोरी आणि निवडणूक अधिकारी म्हणून योगेंद्र दोरकर यांनी काम पाहिले.राज्य भरातील साप्ताहिक विभागातील सर्वांचा जबरदस्त उत्साह व सहभाग होता - संदिप काळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया.

Previous Post Next Post