नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धा संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी) परभणी. सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सेलू, स्वर्गीय सौ.दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धा नूतन कन्या प्रशालेत संपन्न झाली.दि.29 जुलै 2024 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल,स्पर्धेचे परीक्षक एस.डी.पाटील,प्रमोद देशमुख, प्रशालेचे सह शिक्षक भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कै.दुर्गाताई कुलकर्णी आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा प्राचार्य द.रा.कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शना द्वारे पार पडली.खरा तो एकची धर्म ही प्रार्थना रेणुका अंबेकर यांनी म्हटली.कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांनी केले. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सेलू तालुक्यातील 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत अनेक संस्कारक्षम, बोधपर बोध कथा सांगत श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल न तथा आभार कीर्ती राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुनील मोगल, वैशाली चव्हाण, शशिकांत देशपांडे, यशोदा चव्हाण,रूपाली पवार, सुरेखा भांबळे, सोलापूरे प्रणिता, सोनाली कुबरे, सुरेश हिवाळे यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post