धडगांव व मोलगी परिसरातील नेटवर्क समस्यांची ठोस उपाययोजना करावी -बिरसा आर्मी...,....................... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) धडगांव व मोलगी परिसरातील नेटवर्क समास्यासाठी ठोस उपाययोजना करावी यासाठी बिरसा आर्मीने तहसीलदार धडगांव जिओ, बीएसएनएल, एअरटेल नेटवर्कचे अधिकारी व माहिती प्रत खासदार व आमदार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की तंत्रज्ञानाचा या युगात सर्वच कामे आँनलाईन पद्धतीने केली जातात विविध शैक्षणिक कामे विद्यार्थी प्रवेश फार्म, दाखले विविध कल्याणकारी योजना बंकिंग व्यावहार एकंदरीत सर्वच विभागातील कामे करण्यासाठी नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतू भारत दुरसंसार आणि खाजगी कंपन्यांच्या नेटवर्कर वारंवार ठप्प होत असल्याने दुर्गम भागातून शिक्षणिक व विविध फार्म भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना नेटवर्क अभावी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते परिसरातील नागरिकांचे महत्त्वाचे कामे खोळंबली जातात विद्यार्थ्यांचे विविध शिक्षणिक, नोकरी संदर्भातील फार्म व इतर विविध योजनेपासून नागरिकांना वंचित रहावे लागते. यामुळे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक दुष्टिकोनातुन मोठा परिणाम होत आहे संबंधित विभागांने या समस्येची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे निवेदनावर बिरसा आर्मीचे तालुका उपाध्यक्ष कुवरसिंग पराडके, जिल्हा संघटक यशवंत वळवी, तालुका सचिव राजेंद्र पावरा, सहसचिव पिंट्या वळवी, रतिलाल पराडके, डेटका रहासे, डेबा पाडवी, मोतीलाल वळवी, वेलज्या वळवी, राजू पाडवी, अनिल पाडवी, नितीन वळवी आदि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post