जिल्हाशल्य चिकित्सक कार्यलयाला आली चार वर्षाने जागपुन्हा मागितले ग्रामीण रुग्णालय श्रेणी वर्धन करीता कागद पत्रे.. (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून ढाणकी व गाव खेड्यातील नागरीक करत आहेत ढाणकी आरोग्य केंद्रावर ढाणकी सह गाव खेड्यातील रुग्नाचा भार आहे दररोज 200 ते 250 रुग्ण ची तपासणी केल्या जाते प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णावर उपचार करण्यास कोणतीही सुविधा नाही त्यामुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर गंभीर रुग्णावर प्राथमिक उपचार करून तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णाला पाठविले जाते काही रुग्ण तालुका रुग्णालयात जाण्याच्या आधीच उपचारा विना आपला जीव गमावतात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीकरण्यास कोणतीही सुविधानसल्याने गोरगरीब रुग्णालाखाजगी रुग्णालयात प्रसूती करावी लागते काही उपचारा अभावी गरोदर माता मृत्यू झाल्याची सुद्धा घटना घडून गेली आहे ढाणकी व परीसरातील गावखेड्याच्या वाढत्या मागणी चा विचार करून शासनाने 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय श्रीवर्धन करण्यासाठी लागणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचा ठराव पंचायत समिती ठराव घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यलयात पाठपुरावा करावा असे पत्र सॅन 2019 ला नगरपंचातला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया कडून देण्यात आले होते ग्रामीण रुग्णालय होणार म्हणून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी सर्व कागद पत्राचा पाठपुरावा केला परंतुचार वर्ष होत आली तरी पणप्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही त्यामुळे नगरीतील पुढारी पाठपुरावा करत होते नगरीतील पुढाऱ्यांच्या सतत च्या मागणीला पाहून पुन्हा एक वेळ दिनांक 28 जून 2024 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नगरपंचायतीला पत्रदेऊन ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय श्रेणी वर्धन करण्यासठी कागद पात्राची पुरतात करण्यास सुचविले जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय ढाणकी नगरीतील नागरिकांच्या मागणी सोबत सापसिडीचा खेळ तर खेळत नसेलना आसा प्रश्न नगरीतील नेत्या सह नागरिकाला पडला आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने चार वर्षा खाली नगरपंचायतीलाआरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय करण्यासठी लागणारे कागद पत्र याची पुरतात करण्याचे पत्र दिले होते.जिल्हाशल्य चिकित्सक कार्यालयाने सुचविले ले सर्व कागद पत्रे ठराव नगरपंचायतीने नगरीतील नेत्यांनी पुरविले तरी पण जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय चार वर्षा नंतर पुनः त्याच कागद पात्राची पुरतात करण्यास सांगत आहे पहिले दिलेल्या कागद पात्राची फाईल कुठ गेली धूळ खात पडलेली फाईल काढून वेळीच मान्यता दिली असती तर अनेक रुग्णाचा जीव वाचला आसता जिल्हाशल्य चिकित्सक कार्यलयाने ढाणकी व परिसरातील गाव खेड्याच्या रुग्णालयाच्या मागणीशी खेळू नये नाही तर लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल असे नागरीक बोलत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0