*पारंबी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन* (मुक्ताईनगर अतिक खान) नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर येथे नुकतेच शिवशाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. ठाकूर सर होते प्रसंगी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले नंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी सुद्धा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले याप्रसंगी इयत्ता 8 वीची भाग्यश्री इंगळे, इयत्ता 9 वीतील रेणुका दाने ,आदिती पाटील, कोमल खराटे, तुषार बडगे, इयत्ता 10 वीतील लक्ष्मी घटे, प्रीती गवई, पायल पाखरे, प्रिया फुटवाईक, रुचिका घाईट, आदींनी आपला सहभाग नोंदवला तर ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर, श्री एस. के. पाटील, एस. एस. नागे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. ठाकूर सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी व त्यांच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर शिक्षक एस. के. पाटील, एस. एस. नागे, एस. जी. सोनुने शिक्षकेतर रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0