गुळूंचवाडी येथे अंत्यविधी करून परतणाऱ्या गर्दीत ट्रक घुसला :पाच जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी.... (सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर बेल्हे )(ता .जुन्नर ):- नगर-कल्याण महामार्गावर भरधाव ट्रकने अंत्यविधी उरकून आलेल्या लोकांमध्ये घुसुन झालेल्या अपघातात चार जणांचा मुत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या गुळंचवाडी (ता.जुन्नर) या गावात शुक्रवारी सकाळी अंत्यविधी होता.व या गावची स्मशानभुमी या मार्गाच्या बाजुला असुन अंत्यविधी उरकल्यानंतर नागरीक रस्त्यावरून बाहेर जात असताना त्याचवेळी नगरकडुन आलेला भरघाव वेगाने आलेल्या एम.एच.१०ए.डब्लू ३२९७ या ट्रकने महामार्गाच्या कडेला लावलेल्या पाच ते सहा वाहणांना घडवुन अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये शितल योगेश दाते(वय३०)रा.आणे,रियांश योगेश दाते(वय५)रा.आणे,दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय ६२)रा.गुळूंजवाडी,तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय ८०)रा.गुळुंजवाडी यांचा उपचार चालु असताना मुत्यू झाला असुन‌ सुधीर काशिनाथ गुंजाळ,अमोल नाथा गुंजाळ,ज्ञानदेव नामदेव कर्डिले,विठ्ठल हरिभाऊ जाधव,योगेश नारायण दाते,धोडिभाऊ सदाशिव पिंगट यांच्यावर आळेफाटा येथील दवाखान्यात उपचार चालु आहेत. दरम्यान ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून अपघातानंतर गुळंचवाडी नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला. घटनास्थळावर स्थानिक नागरिक आक्रमक होत नागरिकांनी साडेचार तास महामार्ग रोखला. आळेफाटा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध आळेफाटा पोलीस घेत आहे.

Previous Post Next Post