*कुसुंबा घरफोडी प्रकरणी एकास अटक एम आयडीसी पोलिसांची कामगिरी..* ( *जळगाव जिल्हा प्रतिनिधी - योगेश चौधरी*) तालुक्यातील कुसुंबा येथे दि. २ जुलै रोजी सकाळी ६ वा. ते दि. ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वा.चे दरम्यान सदगुरु बैठक हॉल जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराला लावलेला कडी कोंडा तोडुन घरात घरातील वरच्या माळ्यावरील बेडरुम मधील कपाटातुन २ लाख ६८ हजार रु किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम १५ हजार रूपये चोरुन नेले होते. घरमालक सौभाग्य चित्तरंजन सेनापती, (वय २८ वर्षे, रा. सदगुरु नगर, कुसुंबा ता.जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. ते घराला कुलुप लावुन सहपरीवार देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेलेले होते.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी फिर्यादीचे घरात कपाटातील पर्समध्ये ३३ हजार १०० रू. चा मुददेमाल हा फिर्यादीची पत्नी हिस मिळुन आला आहे. त्यामुळे उर्वरित मुददेमालातील एकुण २ लाख ३४ हजार ९०० रुपयाचा मुददेमाल चोरीस गेल्याचे तपास निष्पनन् झाले. तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन संशयित आरोपी अविनाश बन्सीलाल पाटील यास ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला आहे.त्यांचेकडून सदर घरफोडीत चोरलेला एकुण २ लाख ३४ हजार ९०० पैकी २ लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई निरीक्षक दत्तात्रय निकम मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोना / किशोर पाटील, पोका / गणेश ठाकरे, पोकों/ सिद्धेश्वर डापकर, पोकों / चंद्रकांत पाटील, विकास सातदिवे, साईनाथ मुंडे यांनी केली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0