भद्रावतीत आजपासून आषाढी एकादशी महोत्सव.... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती,दि.१७:-येथील श्री.विठ्ठल मंदीर देवस्थान कमिटी किल्ला वार्ड तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील विठ्ठल मंदिरात दि.१७ व १८ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी आषाढी एकादशी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.दि.१७ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची महापूजा व अभिषेक होणार आहे. रात्री ८.३० वाजता ह.भ.प. अर्चनाताई तन्नीरवार चंद्रपूर यांचे राष्ट्रीय कीर्तन पार पडणार आहे. दि.१८ १८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता विठ्ठल रखुमाई पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा विठ्ठल मंदिरातून निघून वाल्मिक चौक, जुने बस स्थानक, गांधी चौक मार्गे परत विठ्ठल मंदिरात येऊन विसर्जित होईल. सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कीर्तन व गोपालकाला त्यानंतर लगेच महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. पालखी शोभायात्रेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, रवींद्र शिंदे, तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपिन इंगळे, न.प.मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, गटशिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश महाकाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळवंतराव गुंडावार, मनोहरराव पारधे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post Next Post