दैनिक आत्ताच एक्सप्रेस ह्या वृत्तपत्राच्या "यवतमाळ जिल्हा कार्यकारी संपादक पदी नागेश रातोळे यांची नियुक्ती. (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी ) दै.आत्ताच एक्सप्रेस ह्या वृत्तपत्राच्या "यवतमाळ जिल्हा कार्यकारी संपादक पदी नागेश रातोळे यांची नियुक्ती मुख्य संपादक सुग्रीव मुंडे व विभागीय संपादक अनिल राठोड यांनी केली . रातोळे यांना, भाजपाचे ढाणकी शहर उपाध्यक्ष पद असून, कोष्टी समाजाचे ढाणकी शहर अध्यक्ष तसेच अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज यवतमाळ जिल्हा संघटक ई पद आहेत. पूर्वीपासूनच नागेश यांना समाजसेवेची आवड आहे.ते गरजवंताना जमेल त्या पद्धतीने मदत करत असतात.त्यांचे गावातील तरुणासोबत जीवाभावाचे संबंध आहे. अनेक तरुणाचे ते गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळे त्यांची राजकारणा मध्ये सुद्धा तगडी पकड आहे. एवढेच काय तर, ते स्वतःचा वाढदिवस सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने मूकबधिर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून, किंवा एखाद्या प्राथमिक शाळेत वह्या, पेन वाटप करून वाढदिवस साजरा करतात. त्यांचे पत्रकार क्षेत्रात येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांना पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड आहे. त्यातच कोणावरही अन्याय, अत्याचार होऊ नये यादृष्टीकोनातूनच आपल्या धारदार लेखणीतून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या क्षेत्रात झाप घेतली. दै. आत्ताच एक्सप्रेस ह्या वृत्तपत्राच्या "यवतमाळ जिल्हा कार्यकारी संपादक पदी नागेश यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर भरभरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्राचा व आपल्या पदाचा गैरवापर करणार नाही तसेच दैनिक आत्ताच एक्सप्रेस ह्या वृत्तपत्राच्या नियमाच्या अधीन राहून काम करण्याचे त्यांच्या नियुक्ती पत्रात मुख्य संपादक सुग्रीव मुंडे व विभागीय संपादक अनिल राठोड यांनी सांगितले आहे. चौकट. दै. आत्ताच एक्सप्रेस या वृत्तपत्रांने माझ्यावर दिलेली जबाबदारी यशस्वी तेने पार पाडण्याचा प्रयत्न करीन. कोणत्याही आमिषाला बळी न पडता मी सदैव निर्भीड, निष्पक्ष व रोखठोक पने पत्रकारिता करीन दैनिक आताच एक्सप्रेस या वृत्तपत्रांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. जो माझ्यावर थोरल्या, तरुण मित्रमंडळी व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांचा सदैव मी ऋणी राहील. नागेश रातोळे
byMEDIA POLICE TIME
-
0