प्रा.राहुल लोव्हारे यांना औषध निर्माणशास्त्रात पीएच.डी प्रदान.. (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) महाविद्यालयाचे प्रा.राहुल बटुसिंग लोव्हारे यांना मंदसौर विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. लोव्हारे यांनी फार्मसी विभागातून पीएच.डीसाठी "फायटोकेमिकल स्क्रिनिंग अँड इवॉलेशन फॉर ऑटीकॅन्सर, ऑटीऑक्सिडेंट,ऑटीमॅकरौबल ऑकटीवीटी ऑफ लीवस कोडीया डायकोटोमा फोर्स्ट " या विषयावर मंदसौर विद्यापीठ (मध्यप्रदेश) अंतर्गत संशोधन करून विद्यापीठास शोध प्रबंध सादर केला होता. संशोधनासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रियांका सोनी (मंदसौर) आणि सहमार्गदर्शक डॉ. राजेश अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. लोव्हारे यांना मिळालेल्या पी.एचडी पदवीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0