परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील नव मतदार नाव नोंदणी अभियान चालू. बालासाहेब जगतकर... (बीड जिल्हा परळी प्रतिनिधी:--) परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील नव मतदार नाव नोंदणी नाव वगळणे नावात दुरुस्ती करणे हे अभियान चालू करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील नव मतदार नाव नोंदणी नाव कमी करणे व नावात दुरुस्ती करणे यासाठी फॉर्म तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भीम नगर जगतकर गल्ली येथील संपर्क कार्यालयात भरून देऊन नाव नोंदणी करण्यात येत आहे यासाठी पासपोर्ट फोटो एक ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड प्यान कार्ड यापैकी एक रहिवासी पुरावा लाईट बिल पासबुक गॅस कनेक्शन बुक यापैकी एक व कुटुंबातील एकाच मतदान कार्ड ची झेरॉक्स इत्यादी आणून नाव नोंदणी करण्यात यावी असे आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली असून याचा जास्तीत जास्त नव मतदारांनी लाभ घ्यावा असेही आव्हान करण्यात आले आहे
byMEDIA POLICE TIME
-
0