हर्षल भदाने यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या.. व्हाईस ऑफ मीडियाची मागणी.... (धुळे जिल्हा प्रतिनिधी )आपले सहकारी हर्षल भदाने यांच्या झालेल्या अपघात प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हर्षल भदाने याच्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः धुळे पोलीस अधीक्षकांची फोनवर बोलणं केलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हर्षल भदाणे अपघात प्रकरणी दोन जणांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून हर्षल च्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही गृहमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातील कारवाई अधिक वेगवान व्हावी आणि हर्षल भदाणे यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळावी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0