भारतीय मजदुर संघाचा ७० वा वर्धापन दिन साजरा.... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )भारतीय मजदुर संघ संलग्न बांधकाम कामगार संघटना शाखा अक्राणी येथे भारतीय मजदुर संघाचा ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गोरज्या पाडवी होते प्रमुख पाहुणे म्हणून विजू महाराज, श्रावण तावडे, नारायण पावरा पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. या कार्यक्रमाला अक्राणी तालुक्यातील बांधकाम कामगारांना भारतीय मजदुर संघाचा ७० वा वर्धापन दिना विषयी गोरज्या पाडवी यांनी माहिती दिली. तचेस बांधकाम कामगारांच्या विविध योजनेविषयी देविदास पावरा यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र पावरा सोमनाथ शिंदे यांनी आभार मानले.

Previous Post Next Post