शिक्षक सेनेच्या वतीने बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण.... (राहुल दुगावकर,उपसंपादक नांदेड जिल्हा) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा नवनिर्वाचित विधान परिषदेचे शिक्षक आमदार आदरणीय श्री ज.मो. अभ्यंकर साहेब यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १३ जुलै ते २७ जुलै या दरम्यान प्रेरणा पंधरवडा संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून साजरा केला जात आहे.त्याचाच भाग म्हणून बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रेरणा पंधरवडा व्यतिरिक्त सुध्दा वर्षभर सातत्याने शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपणाचे सामाजिक कार्य अविरतपणे चालू असते हे सर्वज्ञात आहे.प्रेरणा पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी आज दिनांक २७ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला (खू.) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला (बू.) या शाळेच्चा प्रांगणात प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे २७ जुलै २०२१ रोजी कार्ला (बू.) या शाळेत लावण्यात आलेल्या वृक्षांचा आज तिसरा वाढदिवस वृक्षांना फुगे, रेशमी झालर बांधून व तसेच गावरान सेंद्रिय खताचा केक कापून मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात बालगोपालांना खाऊ वाटप करुन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. व यावेळी नव्याने पिंपळ, वड, करंज वृक्षांचे रोपण करण्यात आले.*विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कार्ला (खू.) चे मुख्याध्यापक श्री पेंडपल्ले सरांनी आज लावण्यात आलेल्या वृक्षांना तात्काळ कुंपण लावून वृक्षसंवर्धनाचा इतरांसाठी आदर्श घालून दिला.*सदरील वृक्षारोपण प्रसंगी केंद्र प्रमुख जयवंतराव काळे सर, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी गेंदेवाड, सचिव राजाराम कसलोड, उपाध्यक्ष शिवराज गागिलगे, इरेशाम झंम्पलकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक सय्यद फैयाज सर, कर्मचारी विजयकुमार गावंडे, साईनाथ हळ्ळीखेडे, अजय डांगे, तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा संपूर्ण स्टाॅफ व विद्यार्थी बांधव उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0