Press Note with Photo *व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने, महानगराध्यक्षपदी मकरंद घोडके तर साप्ताहिक सेलच्या पदी पितळे यांची निवड* अहमदनगर नगर (प्रतिनिधी)जागतिक पातळीवर पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया कार्यरत असूनशासनाला पत्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पत्रकार आणि संघटनेने जागरूक असणे गरजे आहे.आज तत्ववादी पत्रकारिता राहिली नसल्याची खंत व्यक्त करत पत्रकारही लाईफ स्टाइल स्पर्धेच्या गर्तेत अडकला आहे. शारीरिक व्याधींच्या समस्या वाढवून उद्याची भ्रांत , आर्थिक नियोजन शून्य असून ही दुरवस्था पत्रकारांची झाली असल्याने यावर संघटना वाचा फोडणार असल्याचेही संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रतिपादन केले संघटनेची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली त्यावेळी ते बोलत होते. दैनिक नायकचे संपादकगोरक्षनाथ मदने यांची जिल्हाध्यक्ष तर महानगर अध्यक्ष म्हणून मकरंद घोडके आणि साप्ताहिक सेलचे अध्यक्ष श्रीगोंदा येथील पत्रकार पितळे यांची नियुक्ती करण्यात आल. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते पदाधिका-यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर सह अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर विभागातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांसाठी कौशल्य शिक्षण, घरे, आरोग्य, निवृत्तीनंतर पेन्शन योजना आदिंसाठी ही संस्था कार्यरत आहे. पत्रकारांचे जीवन भयान बनले आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटन लढा देणार आहे. राज्यातील 80 टक्के पत्रकार या हक्कापासूनवंचित आहे. येत्या काही दिवसात शिर्डी येथे संघटनेचे शिखर अधिवेशन होणार असल्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले. पत्रकारितेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल अशा अनेक संघटना असून व्हाईस मीडिया ही एक वेगळेपण असणारी संघटना असल्याचे गोरक्षनाथ मदने यांनी सांगितले आपल्या भावना व्यक्त करतांना ते म्हणाले की, मीडियाचा व्हाईस मोठा व्हावा. मीडियाची दिशादर्शककार्यपद्धती पुढे न्यावी लागेल. कृतिशील कार्यक्रमावर भर देऊन पंचसूत्री घटकांचा अंमल करत पत्रकारांना न्याय देण्यासाठी संघटना तत्पर राहणार असल्याचे मदने म्हणाले. सदर अधिवेशन अविस्मरणीय ठरवू असा विश्वास पत्रकारांनी व्यक्त केला.
byMEDIA POLICE TIME
-
0