मेघना बोर्डीकर साठी अमित शाह यांची जिंतूरमध्ये बुधवारी जाहीर सभा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. ) जिंतूर : दि.11 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मेघना बोर्डीकर यांच्यासाठी निवडणू कीच्या प्रचारार्थ जिंतूरात बुधवारी (दि.13) दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेसाठी येत आहेत.या विधान सभा मतदारसंघातील महा युतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघनासाकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह यांची ही सभा होणार असून या सभेच्या निमित्ताने महायुतीच्या कार्यक र्त्यांनी सभेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने भक्कम असे नियोजन केले आहे. विविध बैठकांमार्फत जिंतूर व सेलू या दोन तालुक्या तून मोठ्या संख्येने ग्रामस्थ सभेस उपस्थित रहावे, या दृष्टीनेही व्यूहरचना केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.

मेघना बोर्डीकर साठीअमित शाह यांची जिंतूरमध्ये बुधवारी जाहीर सभा.                                                                 
Previous Post Next Post