आज अजंदे गावात ग्रामपंचायत येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.. (रावेर विशेष जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )तालुका रावेर. जिल्हा जळगाव. आज अजंदे येथे ग्रामपंचायत मध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला . आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारल्या गेलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू करण्यात आलं. संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू झाली. प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. त्यामुळेच देशात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन देशभरात साजरा करण्यात येतो.19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय जारी केला. त्यानुसार देशभरात दरवर्षी संविधान दिवस साजरा केला जातो. त्यानुसार आजच्या दिवशी सरकारी कार्यालयात संविधानाची उद्देशिका वाचली जाते. तसेच संविधानाचं महत्त्व जनतेला कळावं म्हणून विशेष मोहीमही राबवली जाते. अजंदे ग्रामपंचायत येथे उपस्थित. ग्रामसेवक यास्मिन बानो. सरपंच दत्तात्रय कोळी. उपसरपंच मिनाबाई हिवरे. जयेश बिरपन.प्रवीण बिरपण. लताबाई सूर्यवंशी.( पिंटू ) संतोष कोळी. प्रवीण माळी. इत्यादी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0