प्रॉस्परस पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )सेलू : (ता. 26) श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याच दिवशी देशांमध्ये संविधान लागू करण्यात आले होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

