डॉक्टर व्ही एम जैन विद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री पाटीलला व्ही स्कूल कडून प्रोत्साहन बक्षीस. (पारोळा - प्रतिनिधी/ वार्ताहर )येथील बालाजी संचलित डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थीनी धनश्री संजय पाटील व्ही स्कूल अँप वर सलग तीस दिवस अध्ययन केल्यामुळे तिला प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले आहे. वावेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा) या सामाजिक संस्थेने व्ही स्कूल या शैक्षणिक ॲप मार्फत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात दर्जेदार शिक्षण साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने वोपा संस्थेने वी स्कूलची निर्मिती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी धनश्री संजय पाटील सतत 30 दिवस अभ्यास करून ते अध्ययन व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठविले. त्या अध्ययनाची दखल घेत सदर संस्थेने कुमारी धनश्रीला प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून बुद्धिबळ किट व सन्मानपत्र दिले आहे. गेल्या दोन वर्षापासून कुमारी धनश्री पाटील व्ही स्कूल चा अभ्यास करून
byMEDIA POLICE TIME
-
0