चिल्ड्रन डे ला आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा... (पाारोळा | )येथील आई सत्यभामा फाउंडेशन संचलित टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिल्ड्रन्स डे आणि ग्रँड पेरेंट्स डे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ रेखाताई सतीश अण्णा पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा, श्री बाळासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य , अण्णासो दयाराम पाटील माजी नगराध्यक्ष पारोळा, सौ सुशिलाबाई दयाराम पाटील, नानासो सुभाष पाटील माजी पंचायत समिती सभापती पारोळा, आबासो गोविंद शिरोळे माजी नगराध्यक्ष पारोळा, सौ वंदना गोविंद शिरोळे माजी नगरसेविका पारोळा उपस्थित होते. चिमुकल्यांच आपल्या आजी-आजोबांसोबत एक प्रेमाचं नातं असतं आणि आई-वडिलांपेक्षाही जास्त प्रेम ते चिमुकल्यांना देतात म्हणून शाळेने चिल्ड्रन्स डे ला विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांच्या आजी आजोबांसोबत ग्रँड पेरेंट्स डे आयोजित केला. यावेळी प्ले ग्रुप ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी विविध भावनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला यामध्ये विद्यार्थी आजी आजोबांसोबत सहभागी झाले. यामध्ये विविध गेम्स जसे की कार्ड्स पासून टॉवर बनवणे, ग्लास बॅलेंसिंग, बकेट बॉल, फास्ट पिकप असे विविध खेळ घेण्यात आले. त्यासोबतच आजी आजोबांसाठी अंताक्षरीचे देखील आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सांस्कृतिक गीत भक्तीपर गीतं, सिनेमा गीत यांचा आस्वाद घेतला. त्यासोबतच आजी आजोबांसाठी त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून त्यांच्या काळात खेळले जाणारे ,भवरे, मांडोळी, टायर शर्यत, गोट्या अशा खेळांचे देखील आयोजन करण्यात करण्यात आलं होतं आपल्या मनोगतात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी आनंद व्यक्त केला तसेच शाळेचा धन्यवाद दिला आणि भविष्यातही असे कार्यक्रम घेण्यात बाबत आवाहन केले. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य श्री पी. एस. पाटील, अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, शितल अकॅडमी चे प्राचार्य मंगेश पवार विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.

चिल्ड्रन डे ला आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा...                       
Previous Post Next Post