जात प्रमाणपत्राच्या पडताळणी च्या कारणावरून एकाचा खून तळोद्यात एकाच आठवड्यात दोन घातपात. (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार")कायदा सुव्यवस्था धोक्यात‼️दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याचा प्रभाव निष्प्रभ"नंदुरबार:तळोदा - शहरात आज जातपडताळणीचे काम करून देत नाही या कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना घडली असून शहरात आठवड्यात दोन जणांचा घातपात झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे काही दिवसांपूर्वी शहरातील डंपिंग ग्राउंड येथे मृतदेह आढळून आला होता शहरात सुरू असलेले अवैध धंदे व नशेच्या साधनांची विक्री सुद्धा वाढली त्यात दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याला येथील पोलीस स्टेशनचा कार्यभार चालू असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीने जोर धरल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालंय आज सुद्धा शहरातील बायपास रोडवरील वेल्डिंग वर्कशॉप मध्ये एकाचा मृतदेह आढळून आला गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञ पथक आले याबाबत तळोदा पोलिसात दाखल फिर्यादी नुसार संशयित आरोपी बंटी गुलाब राहसे रा. अलवान ता.तळोदा जि. नंदुरबार याने मयत चंद्रकांत जुजाऱ्या पावरा वय - 39 रा.बीजरी ता.धडगांव यांस जात पडताळणीचे काम का करून देत नाही या कारणावरून भांडणाची कुरापात काढून चंद्रकांत यांस झटापटीत मारहाण करून त्याचे डोके वेल्डिंग वर्कशॉप मधील पत्र्याच्या शेड(भिंतीला) असलेल्या लोखंडी पाईपला आपटून त्यास गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले आहे ही घटना दिनांक 28 च्या रात्री घडली व ती दि 29 च्या सकाळी उघडकीस आली याबाबत फिर्यादी प्रताप जुजाऱ्या पावरा पशुधन विकास अधिकारी रा नंदुरबार यांच्या फिर्यादी वरून संशयित बंटी गुलाब राहसे याच्या विरुद्ध तळोदा पो स्टे येथे गु र नं 321/2024 भा दं सं कलम 103(1) 115(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन पुढील तपास स्वतः स पो नि राजू लोखंडे हे करीत आहेत तळोदा पो स्टे चा कारभार अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू होता व आता प्रभारी अधिकारी पण नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्था सोपविल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत तरी त्वरित योग्य दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे लागोपाठ झालेल्या खुना मुळे सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे या आधी बिबट्याच्या भीतीने शहरातील व कॉलनीतील लोक रात्री व दिवसा बाहेर पडायला घाबरत होते त्या बिबट्यांच्या बंदोबस्त सुद्धा अनेक जीव गेल्यावर करण्यात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता आता शहरातील अवैध नशेचे धंदे व त्यातून होणारे खुनांचे सत्र यामुळे नागरिक पुन्हा एकदा दहशतीखाली वावरत आहेत याचा बंदोबस्त पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0

