सेलू नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळ यांचा विजय भांबळे यांना जाहीर पाठिंबा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी) . माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळ यांच्या पाठिंब्यामुळे विजय भांबळे यांचा विजय निश्चित. सेलू : सेलूचे माजी नगराध्यक्ष श्री.विनोद बोराडे यांच्या विनोद बोराडे मित्र मंडळ व जनशक्ती विकास आघाडी पक्षा तर्फे जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्री विजय भांबळे यांना जाहीर पाठिंबा दिल्या मुळे विजय भांबळे यांच्या विजयाची दाट शक्यता वाढली आहे. आज सेलू येथे विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे आयोजित विनोद बोराडे यांच्या समर्थकांच्या बैठकीत सेलू शहराच्या सर्वांगीण विकासा साठी व जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व समाजहित लक्षात घेऊन जिंतूर विधान सभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयरावजी भांबळे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अनुसंगाने सेलू शहरातील मुख्य प्रश्न मार्गी लागावे सेलू शहरातील जनतेची नाळ ओळखून जनतेच्या मनात काय आहे हे लक्षात घेऊन शहराचा विकास कसा करता येईल याचा नेहमीच ध्यास घेणारे लोकप्रिय नगराध्यक्ष असा लौकिक असणारे विनोद बोराडे यानी आज दि.8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सर्वानुमते जनहीत लक्षात घेता विजयरावजी भांबळे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.याप्रसंगी अशोक नाना काकडे, राजेंद्र लहाने,विनायक पावडे, प्रमोदराव भांबळे, प्रेक्षाताई भांबळे, बाळासाहेब भांबळे,अजय भैय्या चौधरी, अशोकराव चौधरी, कृष्णा देशमुख,विनोद राठोड,सुधाकर रोकडे, मनोज मते, बोराडे परिवारातील जेष्ठ सदस्य अंकुश आबा बोराडे, नामदेवराव बोराडे, भरतराव बोराडे, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मुकेश भाऊ बोराडे, सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, युवा नेते साईराज भैय्या बोराडे, नगराध्यक्ष मारुती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी नगर सेवक मिलिंद सावंत, वहिदभाई अन्सारी , गौतम धापसे, बबन गायकवाड, रमेश दौड सचिन कोरडे,बालाजी सरकाळे, राजेंद्र पवार झोडगावकर, व्यंकट बापू चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, सतीश जाधव, आयुब भाई, कासीम भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

सेलू नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळ यांचा विजय भांबळे यांना जाहीर पाठिंबा.                    
Previous Post Next Post