.मानवत शहरातून *पाच जण उमऱ्यासाठी मक्का–मदीना* रवाना. (मानवत / प्रतिनिधी) मानवत शहरातील गालिब नगर परिसरातील पाच जण उमरा करण्यासाठी *मक्का–मदीना* (सौदी अरेबिया) येथे रवाना झाले. मानवत रोड येथून रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करून तेथून पुढे विमानाद्वारे पवित्र यात्रेचा पुढील टप्पा पार पडणार आहे.रवाना झालेल्यांमध्ये मोहम्मद फारुख अब्दुल रहिम बागवान, त्यांची आई व पत्नी यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शेख अजिम बेलदार व त्यांची आई ही उमऱ्यासाठी निघाले आहेत. कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारांनी स्टेशनवर उपस्थित राहून शुभेच्छा देत सुरक्षित प्रवास व सफल उमऱ्यासाठी दुवा केली.उमरा ही पवित्र उपासना वर्षभरात कधी ही करता येते. यात्रेत उमरकर्ते हरम शरीफमध्ये प्रवेश करून तवाफ, सई यांसह धार्मिक अर्हता पार पाडतात. शहरातून निघालेल्या मंडळींनी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करून शांततेत व श्रद्धेने उपासना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलेस्थानिक नागरिक व समाजस्वीयांनी या प्रसंगी आनंद व्यक्त करत, “मानवत शहराच्या वतीने आपण सर्वांच्या भलाई, सलामती आणि देश–दुनियेच्या अमन शांतीसाठी दुआ करा,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.मुंबईतून आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मंडळी सौदी अरेबियाकडे प्रयाण करतील. यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार उमरा पूर्तता करून ते लवकरच सुरक्षित परतणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.***
byMEDIA POLICE TIME
-
0