*चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर श्री.रोशन कोमरेड्डीवार यांची नियुक्ती !* (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.23:- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रांताध्यक्ष श्री.मेहबूबभाई शेख यांनी आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर श्री.रोशन कोमरेड्डीवार यांची नियुक्ती केली.मुंबई येथे पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस श्री.रवींद्र पवार,जिल्हाचे पक्ष निरीक्षक श्री.अविनाश गोतमारे,चंद्रपूर जिल्हयाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुनाज शेख यांच्या उपस्थितीत युवकचे प्रांताध्यक्ष श्री.मेहबूबभाई शेख यांनी श्री.रोशन कोमरेड्डीवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करतांना आद.शरदचंद्र पवार साहेबांचे विचार जिल्हाभरात युवकापर्यंत पोहोचवून जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी मजबुतीने उभी करण्याच्या शुभेच्छ्या दिल्या !*
byMEDIA POLICE TIME
-
0