*पारोळा पोलिसांचा गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापा* (पारोळा तालुका प्रतिनिधी यशवंत पाटील) ताालुक्यातील नगांव शिवारात पोलीसानी गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. तालुक्यातील नगांव शिवारात लोणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याचा आडोश्याला ज्ञानेश्वर बाजीराव नाईक (भील) रा. नगांव (ता.पारोळा) हा गैरकायदा विना परवाना गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा मार्गदर्शनात सपोनि योगेश महाजन, पोहेकॉ शरद पाटील, अभिजित पाटील, यांनी नऊ रोजी सायंकाळी पाच वाजता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन छापा टाकला असता यावेळी प्लास्टिकचे चार ड्रम व गुळ मिश्रित रसायन असे एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. दरम्यान आरोपी ज्ञानेश्वर नाईक हा पसार झाला असून त्याविरुद्ध पारोळा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*पारोळा तालुका प्रतनिधी*यशवंत पाटील,पारोळा

पारोळा पोलिसांच्या  गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापा*                                                                                     
Previous Post Next Post