संविधानाच्या अनादर विरोधी पक्षाचे नेतेच करतात -नामदार रक्षाताई खडसे. (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी:) संविधान हा आपला ग्रंथ आहे. भाजपाचे लोक संविधान बदलतील असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो. मात्र संविधानाचा अनादर व अपमान विरोधकच जास्त करत आहेत. तसेच राज्यात पुनश्च महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय युवक व कल्याण क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला. शहादा येथील जनता चौकात भाजपाच्या वतीने झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार आमदार राजेश पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपाचे प्रदेश सदस्य व ज्येष्ठ नेते दीपकभाई पाटील, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, विधानसभा प्रभारी कैलास चौधरी, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, माजी नगरसेवक लक्ष्मण कदम, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, शिवसेनेचे डॉ. राजेंद्र पेंढारकर, रोहनकुमार माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नामदार खडसे म्हणाल्या की, भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांनी गेल्या पाच वर्षात शहादा तळोदा मतदारसंघात अनेक जनहिताची कामे केली आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार मजबूत करण्यासाठी तसेच राज्यात पुनश्च महायुतीचे सरकार येण्यासाठी राजेश पाडवी यांना बहुमताने विजयी करा. केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी भाजप व महायुतीला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, डॉ. कांतीलाल टाटिया, लक्ष्मण कदम, दिनेश खंडेलवाल यांची भाषणे झाली. उमेदवार आमदार राजेश पाडवी यांनी गत पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले. आभार शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले. जनता चौकात झालेल्या या सभेस महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
byमीडीया पोलीस टाईम
-
0