बोर्डीकर कुटुंबीयांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही.-डॉ. संजय रोडगे. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी) . सेलू तालुक्यातील धनगर समाजाचा मेळावा संपन्न.अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती.सेलू : ता. 12 जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील अनेक वर्षा पासून बोर्डीकर कुटुंबीय सत्तेत असताना कधीही जातीपातीचे राज कारण केले नाही. तसेच मा. आ. मेघना दीदी यांनीही मागील पाच वर्षांमध्ये मतदार संघांमध्ये विकासाचे तसेच वैयक्तिक कोणीही त्यांच्याकडे काम घेऊन आले असता त्यांनी त्यांची कधी जात किंवा पक्ष न विचारता कामे केलेली आहेत. मागील दहा वर्षांमध्ये देशात मोदीजींनी चे काम केलेले आहे त्यावरून सर्वांना आपल्या हक्काचे घर असेल पिक विमा असेल तसे शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सर्वांना त्यांचा लाभ मिळवून दिला आहे असे प्रतिपादन डॉ. संजय रोडगे यांनी केले.श्रीराम प्रतिष्ठान विद्या विहार संकुल येथे सेलू तालुका धनगर समाज बांधवांची मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रमुख अतिथी सेलू जिंतूर मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मेघना दीदी साकोरे- बोर्डीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे प्रमुख उपस्थिती माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, मा सुरेश भुमरे, मा. भागवत दळवे, ॲड. दत्तराव कदम, दिनकर वाघ, अजय डासाळकर, माऊली ताठे, रंगनाथ सोळंके, बाबा काटकर, अविनाश शेरे, प्रकाश गजमल, ऋषिकेश सोपणार, शिवहरी शेवाळे, दत्तराव मोगरे, विलास सरोदे, गणेशराव काळे, सुदामराव रोकडे, किशोर कारके, भागवत बोबडे, भागवत अण्णा दळवे, दौलत माने, तुकाराम महाजन, गोरख रोकडे, दुर्गादास आळसे, शिवाजी हिंगे, शुभम खुलासे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार मेघनादीदी यांनी उपस्थितांशी संवाद साधत असताना देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्व समाजातील नागरिकां साठी कल्याणकारी योजना राबवल्या त्याबाबत सर्वांना सांगितले. यामध्ये आब कि बार चारसो पार याप्रमाणे भारतातील सर्वच स्तरातील जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवणारे पहिले पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रामध्ये जाती- जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम शरदचंद्रजी पवार यांनी केले. गावांमध्ये सर्व जाती धर्मातील जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. पवार साहेबांनी एवढे वर्ष सत्ता भोगली परंतु समाजासाठी काहीही केले नाही. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान या जनतेने पवार साहेबांना दिला परंतु त्यांनी एकही निर्णय मराठा समाजासाठी घेतला नाही तसेच धनगर समाजासाठीही घेतला नाही. हे काम केवळ आपल्या भारतीय जनता पार्टी पार्टीने या महाराष्ट्रात तसेच देशात केले. विश्वकर्मा योजनेबाबत ही यावेळी उपस्थिता ना जनतेला झालेला फायदे यावेळी सांगित ले.या प्रसंगी डॉ. रोडगे म्हणाले की, काल परवा संभाजीनगर येथील सभेत देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले की, औरंगाबादचे जे नामकरण संभाजी नगर हे झालेले आहे तसेच अहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर हे झालेले आहे. आमचे सरकार आले की परत आम्ही यामध्ये बदल करून औरंगाबाद व अहमद नगर हे करू हे कितप त योग्य आहे असा यावेळी प्रश्न उपस्थित केला. मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःचे बलिदान दिले परंतु धर्म बदलला नाही. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मुघलांशी व इंग्रजांशी झुंज देऊन एक पराक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा केला. त्यांना यांचा विरोध अशा प्रकारे असेल तर जनतेनेही त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहू नये असे यावेळी सांगितले. मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये लोक सभेचे उमेदवार महादेवजी जानकर साहेबांनाही आम्ही लोकसभेसाठी तन-मन-धनाने मदत केली. दिवस-रात्र एक करून प्रचार केला. यामध्ये आम्ही कधीही जातीचे राजकारण केले नाही. त्यावेळी आम्हाला डुबलीकेट मराठा असेही संबोध ण्यात आले परंतु आम्ही न खचता मना मध्ये कुठल्याही जाती द्वेष न करता आम्ही प्रामाणिकपणे काम केले. खऱ्या अर्थाने जातीवाद करणारे कोण आहेत हे आज जातीच्या नावावर मते मागत आहेत. 1991 मध्ये शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप मा. शरद पवारांनी केले. जैसी करणी वैसी भरणी याप्रमाणे आज त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे असे यावेळी सांगितले. तसेच यावेळी मा. सुरेश भुमरे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत असताना मा. आ. मेघनादीदी बोर्डीकर यांच्या पाठीमागे भावाप्रमाणे भक्कम उभे राहून साथ देण्याचे यावेळी उपस्थित समाज बांधवांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत दळवे यांनी केले सूत्रसंचालन डीगांबर टाके यांनी केले तर आभार ॲड. दत्तराव कदम यांनी मानले.

बोर्डीकर कुटुंबीयांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही.-डॉ. संजय रोडगे.                                                       
Previous Post Next Post