दिग्गजांच्या रणधुमाळीत रावेर मतदार संघात अपक्ष उमेदवार वाऱ्यावर .. (फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी )तालुका यावल येथील रावेर विधानसभा मतदार संघाची रणधुमाळी सुरू असताना दिग्गज उमेदवार धनंजय शिरीष दादा चौधरी तसेच अनिल चौधरी आणि शमीभा पाटील आदी दिग्गज उमेदवार या निवडणुकीत आपला भवितव्य आजमावत आहे रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष् उमेदवार मात्र वाऱ्यावर आहे रावेर यावल विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात असून प्रमुख उमेदवारांमध्ये आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी हे महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवीत असून तसेच अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती बच्चू कडू यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवीत आहे तसेच शमीभा पाटील हे वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात असून हे सर्व दिग्गज उमेदवार रिंगणात असताना रावेर यावल विधानसभा मतदार संघात आमदार पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना मात्र यावेळेस अपक्षांकडे कोणीही मतदार फिरून पाहत नसल्यामुळे काहीतरी आपल्याकडे दिखावा असावा म्हणून रोजंदारीचे मुलं आणून गाजा वाजा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ज्या मुलांचे मतदार यादी मध्ये नाव सुद्धा नाही अशा अल्पइन मुलांचा वापर या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच या निवडणुकीत अपक्ष उमेदवार हे केवळ मत खाण्यासाठी उभे असल्याचे उघडपणे बोलले जात आहे आणि त्यांना विरोधकांकडून प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा रावेर यावल विधानसभा मतदारसंघात सुरू असून त्याचा कोणताही परिणाम या उमेदवारांवर होणार नसल्याचे उघडपणे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे
byMEDIA POLICE TIME
-
0