*परभणी जिल्हाच्या शिरपेचात मानाचा अजून एक तूरा.......**कृषिभूषण आ. कांतराव काका देशमुख यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार जाहीर**. ( प्रतिनिधी / अनिल चव्हाण )** =====================*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिना निमित्त 2023- 24 या वर्षासाठीचा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 30 जानेवारी रोजी दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला असून या वर्षीचा *जीवन साधना गौरव पुरस्कार* कृषीभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांना जाहीर झाला.या पुरस्काराचे वितरण दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी ठिक 11 वाजता महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे. कृषिभूषण कांतराव काका देशमूख झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी-भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी सामाजिक, जांभुळभेट संवर्धन, एक गाव-एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळीची पायाभरणी करीत सामाजिक योगदान दिलेले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना *जीवनसाधना गौरव पुरस्कार* 2023-24 देण्याचे जाहीर केले आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.***

परभणी जिल्हाच्या शिरपेचात मानाचा अजून एक तूरा.......**कृषिभूषण आ. कांतराव काका देशमुख यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार जाहीर**.                  
Previous Post Next Post