**मानव विकास अंतर्गत मोफत सायकल योजना अंतर्गत गटसाधन केंद्रात महत्वाच्या बैठकीचे आयोजन*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————मानव विकास कार्यक्रम 2023-24 अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतराच्या आत येत असलेल्या आणि सदर योजनेचा लाभ यापुर्वी न घेतलेल्या तसेच मानव विकास बस योजनेचा लाभ न घेणाऱ्या केवळ मुलींसाठी वर्ष 2023-24 ची लाभार्थी यादी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना आपणास देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार व आपण सादर केलेल्या प्रस्तावानुसार या कार्यालयास सर्व मिळून एकत्रीत प्रथम टप्यात 918 व दिव्तीय टप्प्यात एकत्रीत प्रथम व द्वितीय याप्रमाणे सर्व मिळून 942 लाभार्थीनीची यादी प्राप्त झालेली होती.प्राप्त यादी नुसार सदर प्रस्ताव हे मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेस्तव सादर करण्यात आले होते त्यानुसार मानवत तालुक्यातील 2023-24 मधील एकत्रीत 942 पैकी तांत्रिक मान्यते नुसार 838 लाभार्थी संख्या मान्य झालेली असून सदर विद्यार्थीनीसाठीचा आवश्यक असलेला प्रथम टप्पा @3500/- प्रमाणे निधी या कार्यालयास प्राप्त झालेला असून सदर निधी हा संबधीत लाभार्थी विद्यार्थीनींच्या खात्यात DBT द्वारे वर्ग करण्याच्या स्पष्ट सुचना प्राप्त झालेल्या आहेत आहेत. त्यानुसार आपल्या शाळा/महाविद्यालयाच्या मागणी नुसार 2023-24 मध्ये इयत्ता 8वी ते 12वी वर्गात असलेल्या व 2024-25 या शैक्षणिक सत्रात आपल्या शाळेत सद्यस्थितीत प्रवेशित व उपस्थित आहेत का ? याची खात्री करून सदर विद्यार्थीनींचे वैयक्तीक बँक तपशिल तपासून व सदर यादी प्रमाणीत करून प्रथम प्राधान्याने दि. 06-01-2025 रोजी स्वतः कार्यालयात सादर करावी असे पत्र आपणास देण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे संबधित 20 शाळेपैकी 09 शाळांनी सदर प्रमाणीत यादी व प्रमाणपत्र तपशिल सादर केलेला आहे. बाकीच्या 11 शाळेचा तपशिल अद्याप अप्राप्त आहे.सदर निधी तात्काळ वितरीत करण्यासाठी उद्या दि.29/01/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता गट साधन केंद्र, मानवत येथे मानव विकास योजना 2023-24 व 2024-25 च्या संबधित शाळेतील मुख्याध्यापक यांची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे तरी सदर बैठकीस सर्व अद्यावत माहितीसह आपण स्वतः व सदर काम करणारी व्यक्ती यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांनी केले आहे. सोबत मानव विकास प्रमाणपत्र प्राप्त शाळा यादी 2023-24 मनोज चव्हाण गट शिक्षणाधिकारी गट साधन केंद्र, मानवत यांनी केले आहे.****

मानव विकास अंतर्गत मोफत सायकल योजना अंतर्गत गटसाधन केंद्रात महत्वाच्या बैठकीचे आयोजन*.         
Previous Post Next Post