ब्रह्माकुमारी विद्यालया च्या गीता ज्ञान महोत्स वास सुरुवात. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : दि. 27 जाने.रोजी सेलूयेथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सेलू येथील श्री साईबाबा मंदिरात राष्ट्रीय प्रवचन कार राजयोगिनी भारतीदीदी यांच्या अमृततुल्यवाणीतून श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजता मंगल कलश यात्रा मिरव णूकीला उत्साहात सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात बसस्थानक, रेल्वे स्थानक रोड, संत गोविंदबाबा चौक, क्रांती चौक मार्गाने साईबाबा मंदिरात समारोप झाला. अश्व रथामध्ये भारती दीदी व सुमन दीदी विराज मान होत्या‌. मिरवणुकीत मंगल कलश धारी महिला, परभणी येथील साईबाबा प्राथमिक शाळेच्या मुलींच्या लेझीम पथकाने शिक्षक दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखा ली लेझीम प्रात्यक्षिके तसेच सेलू येथील यशवंत विद्यालयाच्या मुलींनी छाया कोतवा ल,अनुराधा नावाडे यांच्या मार्गदर्शना खाली टिपरी नृत्य सादर करून लक्ष वेधले‌. महोत्सवा निमित्त दररोज सकाळी ६ ते ७ म्युझिकल एक्झर साइज मेडिटेशन, तसेच सकाळी ७ ते ८ तणामुक्त खुशनुमा जीवन शिबिर आणि सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारती दीदी यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद् भगवद्गीता प्रवचन श्रवणाची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समारोप प्रसंगी करण्यात आले आहे. मिरवणुकीत ब्रह्माकुमारी शांता दिदी‌, नंदा दीदी, अर्चना दीदी, सविता दीदी, सरिता दीदी, शारदा दीदी, योगिता दीदी, वैष्णवी दीदी, वैशाली दिदी, सीमा दीदी, प्रणिता दीदी, राधा दीदी, शिल्पा दीदी, रेखा दीदी, रूपा दीदी, सारिका दिदी, श्रुती दीदी, रूपाली दीदी, जया दिदीसोनू दीदी आदींसह ब्रह्माकुमारी परिवारा तील भाई, बहेन, शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो : सेलू् (जि.परभणी) येथे ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने आयोजित श्रीमद् भगवद् गीता ज्ञान महोत्सवानिमित्त सोमवारी शहरात मंगल कलश यात्रा मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.

ब्रह्माकुमारी विद्यालया च्या गीता ज्ञान महोत्स वास सुरुवात.                                                                  
Previous Post Next Post