*भ्रष्टाचारी अधिका-यांविरोधात आदिवासी संघटनांचे प्रजासत्ताक दिनी ठिय्या आंदोलन;पालकमंत्र्यांना निवेदन*. ( नंदूरबार प्रतिनिधी ):बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदूरबार संघटनेतर्फे २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी,नंदूरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी,किसन वसावे, लालसिंग पाडवी, बिरसा फायटर्सचे वनसिंग पटले,हान्या वसावे, बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी, विश्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व आरोग्य विभागाचे डाॅक्टर, परिचारिका ,कंत्राटी कर्मचारी आदि असंख्य कर्मचारी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले. लोकशाहीची हत्या करणा-या,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटण्यास लावणा-या, पैसे वाटणा-यांचे समर्थन करणा-या,पैसे वाटणा-या भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या,निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर करणा-या ,पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणा-या व पात्र वनदावे अपात्र करून आदिवासी बांधवांना वनहक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणा-या ,आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणा-या उपविभागीय अधिकारी शहादा श्री.सुभाष दळवी यांना सेवेतून काढून टाका, पदावरून तात्काळ हटवा.नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.वर्षा लहाडे यांची जिल्हा बदली करा व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण/ भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी.बिलीचापडा ता.तळोदा येथील २१ मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स पैशांच्या अपेक्षेने तब्बल ५ वर्षे दडपून ठेवणा-या श्री.हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून काढा.स्व.दिपाली चित्ते यांचा चाकूने खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा व दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ,चाकूने गंभीर दुखापत झालेली असतानाही पोलीस ठाणे शहादा येथील संबंधित पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला नाही,त्या संबंधित पोलीस अधिकारी व चाकूने गंभीर दुखापत झालेली असतानाही सिंपल इन्जूरी, साधी दुखापत असा खोटा अहवाल लिहणा-या सरकारी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टर यांनाही सहआरोपी करा व सेवेतून काढून टाका.कुलकर्णी रूग्णालय शहादा यांची मान्यता रद्द करा. बिलीचापडा ता.तळोदा येथील आदिवासी बांधवांची जन्म मृत्यू नोंद करा.जन्म मृत्यूची नोंद न करणा-या ग्रामसेवकाला सेवेतून काढा.गांवात शाळा,अंगणवाडी,पाणी,रस्ता,विजेची सोय इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या.ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटील हे शिक्षक, आरोग्यसेवक, अंगणसेविका इत्यादी दोन पदांवर काम करून दोन पदांचे पगार/मानधन घेऊन शासनाची फसवणूक करणा-यांवर कडक कारवाई करा.शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थांच्या जेवणासाठीची अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करा. जिल्ह्य़ातील प्रलंबित वनदावे निकाली काढा.सामाजिक कार्यकर्ता अजय वळवी रा.पिंपळबारी ता.धडगांव यांच्यावर जीव घेणा हल्ला करणा-या आरोपींविरुद्ध अधिक कलम लावून तात्काळ अटक करा.या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली खोक वर पाय?डाॅ.वर्षा लहाडें यांची जिल्हय़ातून हकालपट्टी झालीच पाहिजे!भ्रष्ट अधिकारी चलो जाव!भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!भ्रष्ट अधिकारी सुभाष दळवींवर कारवाई झालीच पाहिजे!आदिवासींची जन्म मृत्यू नोंद झालीच पाहिजे! सरकार हमसे डरती है,पुलीस को आगे करती है!अशा जोरदार घोषणा देण्यात आले.

भ्रष्टाचारी अधिका-यांविरोधात आदिवासी संघटनांचे प्रजासत्ताक दिनी ठिय्या आंदोलन;पालकमंत्र्यांना निवेदन*.                                                                           
Previous Post Next Post