**एक गाव एक स्मशानभूमी काळाची गरज* *@)> मा. कांतरावजी देशमूख**. { प्रतिनिधी / अनिल चव्हाण }*परभणी जिल्ह्याचे समाज भूषण आ. श्री कांताराव काका देशमुख , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी येथे राष्ट्रीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आ. कांतराव काका देशमूख प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी आ. कांतराव काका देशमूख यांनी मार्गदर्शन करतांना गावातील विविध‌ प्रश्नावर सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी आ. कांतराव काका देशमूख हे मार्गदर्शन करतांनी म्हणाले की *एक गाव एक स्मशानभूमी* ही काळाची गरज आहे. कारण जात जन्माने मिळते जी मागुन मिळत नाही ती जात असते. कोण्या जातीत जन्माला आलोत या पेक्षा जन्माला आल्या नंतर समाजासाठी कसं जगलो हे महत्त्वाचे असते. यावेळी पाथरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा बालकिशन भाऊ चांडक के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डाॅ. भास्कर मुंडे , प्रा. सुनिताताई कुकडे , सावळी ग्राम पंचायतीचे सरपंच माणिकराव काळे पाटील, सावळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच गोपाळ आबा काळे पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मा. गोविंदराव काळे पाटील ,सावळीचे पोलिस पाटील बाळासाहेब काळे पाटील , सावळी ग्राम पंचायतीचे सन्माननिय सदस्य बाळासाहेब काळे पाटील , आसाराम काळे पाटील , विठ्ठलराव काळे पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष नामदेवराव काळे पाटील ,सावळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबुरावजी ईक्कर , सहकारी शिक्षक वृंद तसेच सावळी गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

एक गाव एक स्मशानभूमी  काळाची गरज*           *@)> मा. कांतरावजी देशमूख**.                          
Previous Post Next Post