गणित संबोध परीक्षेत गुरुनानक पब्लिक स्कूलच्या वेदांती नवघरेचा प्रथम क्रमांक. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.28:- बल्लारपूर: "चंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ, चंद्रपूर" यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय "गणित संबोध परीक्षा" वर्ग 5 व वर्ग 8 गटासाठी घेण्यात आली. या परीक्षेत गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर येथील कुमारी वेदांती अमित नवघरे हिने उज्वल यश संपादन केले असुन, वर्ग 8 गटात प्रथम क्रमांक मिळवत तिने शाळेचा गौरव वाढवला आहे.कुमारी वेदांतीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून पुरस्कृत करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक वर्ग आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. वेदांतीच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणित संबोध परीक्षेत गुरुनानक पब्लिक स्कूलच्या वेदांती नवघरेचा प्रथम क्रमांक.                                               
Previous Post Next Post