*दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकरीता यावलचे हसन तडवी यांची नियूक्ती..* दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता महाराष्ट्र राज्यातील जल जीवन मिशन अंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या अकोला, अमरावती, चंद्रपूर ,गोंदिया, धुळे, जळगाव ,नंदुरबार, सांगली या जिल्ह्यातील पाणी समितीच्या सदस्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.जल जीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे कार्यरत श्री. तडवी हे दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळा करिता जल जीवन मिशन अंतर्गत नोडल अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.सदरचे कामकाज जल जीवन मिशनचे माननीय अभियान संचालक व माननीय अतिरिक्त अभियान संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करतील

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकरीता यावलचे हसन तडवी यांची नियूक्ती..* 
Previous Post Next Post