*निप्पान प्रकल्पग्रस्तांचे आमदार करन देवतळे यांना साकडे..* (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.7:-१९९४ पासून ते आजतागायत भिजते घोंगडे ठरलेला प्रकल्प स्थानीक प्रकल्प ग्रस्तांना देशोधडीला लावणारा ठरला. तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे अशी गत स्थानीक शेतकरी व शेतमजुरांची झालेली आहे. शेती अभावी बेरोजगारांची प्रचंड संख्या वाढली आहे राज्यात बहुमताचे स्थिर सरकार कार्यरत झाले आता तरी नव्याने येत असलेल्या कंपनीत बेरोजगारांना रोजगार व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उचीत आर्थिक मोबदला मिळावा या उद्देशाने स्थानीक आमदाराने पुढाकार घेऊन थेट वरिष्ठ राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार. करन देवतळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर शिष्टमंडळात प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे, मधुकर सावनकर, लिमेश माणूस मारे, बंडू भादेकर , अशपाक शेख, संतोष नागपुरे यांचा सहभाग होता. निवेदनाची दखल घेत लवकरच वरिष्ठ स्तरावर सभा आयोजित करून शासनास ठोस निर्णायक भूमिका घेण्यास प्रवृत्त करु असे आश्वासन मा. आमदारांनी दिले.

निप्पान प्रकल्पग्रस्तांचे आमदार करन देवतळे यांना साकडे..*                                                                 
Previous Post Next Post