सौ. सा. ब. बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू :येथील प्राथमिक शाळेत दि. 05 फेब्रु. 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. मकरंदजी दिग्रसकर,प्रमुख पाहुणे- मा.डॉ.एन.टी कुंदनानी तसेच दत्तराव जी पावडे,राजेशजी गुप्ता, मा. संपतराव खरात उपस्थित होते.शालेय मुख्याध्यापक बेंडसुरे एस. डी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ज्येष्ठ शिक्षक सावरगावकर पि.के यांनी शालेय अहवालाचे वाचन केले. पाहुण्यांचा परिचय पांडे यु.जी.यांनी केला कार्यक्रमात बाल सभेतर्फे सांस्कृति क कार्यक्रम व नाट्य करण सादर करण्यात आले. कार्यक्रमात गुणवत्ता पारितोषिक, कृष्णरूप सज्जा व विषय स्पर्धा पारितो षिक, तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाल सभेचे चिमुकले विद्यार्थी कु. ढाकणे अनया व चि. इंगळे पृथ्वीराज यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळे तील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच पालकांचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0