जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये १० वीचे विद्यार्थ्यांना दिला निरोप समारंभ. (यावल दि.२४ (सुरेश पाटील )आज दि.२३ जाने २०२५ रोजी जे. टी महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे इ १० वी च्या विदयार्थाचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदरणीय शरददादा महाजन यांनी स्वीकारले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पूजन करून करण्यात आले.क्रार्यक्रमाला आदरणीय ए.बी. महाजन,प्रार्चार्य रंजना महाजन मेडम व प्रार्चार्य दिपाली धांडे मेडम उपस्थित होते.विदयाध्यानी स्कुल विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.सर्व वातावरण भावुक आनंदवन होऊन गेले.शरददादा महाजन यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.त्यानी सांगितले की तुम्ही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास,प्रयत्न केले पाहिजे त्यांनी पुजनीय दादासाहेब जे.टी.महाजन यांचीही माहिती सांगितली. त्यांनी समाजकल्याणासाठी जी महान कार्य केलेली आहे. ते सांगितले समाजाची प्रगती व्हावी,त्यांना रोजगार मिळावा यासाठी अनेक संस्था,औद्योयोगिक प्रशिक्षण, सहकार क्षेत्र त्यांनी निर्माण केले विदयाटर्याचे भविष्य चांगले घडो अशा शुभेच्छा दिल्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांनी बक्षिसे देवून केला.त्याचप्र‌माणे माननीय ए. बी.महाजन यांनीही विद्याथ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक, धाडसी असणे गरजेचे आहे. आदरणीय प्रा.रंजना महाजन मेडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षिका सरोज येवले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी खेळ खेळून,नृत्य करून मनोरंजन केले स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला सर्व विदयाथ्याना स्कूल तर्फे भेटवस्तू देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनइ.९ वी च्या विद्यार्थिनी निधी पाटील व वैष्णवी भंगाळे यांनी केले.तसेच शिक्षिका प्रेरणा भंगाळे यांनी या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले अशा रीतिने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये १० वीचे विद्यार्थ्यांना दिला निरोप समारंभ.                                      
Previous Post Next Post