आदिवासी भिल्ल वस्तीची पाहणी करून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सोडविल्या समस्या. (यावल दि.२५ (सुरेश पाटील ) यावल शहरातील बोरावल गेट भागात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती असून या भागात अनेक समस्या आहेत या समस्या जाणुन घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी म्हणून त्या भागातील नागरिकांनी गळ घातली होती. त्यानुसार आज अतुल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेऊन नगरपालिका संबधित आधिकर्याना प्रत्यक्ष स्थळी बोलावून घेतले. याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल येथील आदिवासी भिल्ल समाज वस्ती मध्ये शांतीनगर म्हणून भाग आहे तेथील नागरिकांच्या आग्रहास्तव पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आज कार्यकर्त्यांसह भेट देऊन पाहणी केली.पाहणी दरम्यान अनेक समस्या निदर्शनास आल्याने त्यांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी व पाणी पुरवठा अभियंता सत्यम पाटील,कर्मचारी कमील शेख, अजय मेढे,यांना प्रत्यक्ष स्थळी बोलावून घेतले. परिसरात महिला व पुरुषांनी त्या भागात नळ घेण्यासाठी पाइप लाइन नसल्याने ती टाकून मिळावी अशी मागणी केली.एकाही घरामध्ये वैयक्तिक शौचालय नसून सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी केली आहे.परिसरात असलेले पथदिवे ४ ते ५ वर्षापासून बंद असुन आम्हाला कोणीही वाली नाही अशी खंत व्यक्त करून नगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली. या भागांतील गटारी दोन दोन तीन तीन महिने सफाई केली जात नाही. या सर्व बाबी लक्षात घेता तत्काळ वीज कर्मचारी यास बोलावून त्या भागांतील तिन खांबावरील बंद पथदिवे बसविण्यात आले व गटारीचे नियमित साफसफाई केली जाणार असल्याचे अभियंता सत्यम पाटील यांनी संबधीत सफाई कामगार यांना सुचित केले आहे तर लवकरच या भागात शौचालयाचे बांधकाम करण्याची मान्यता मिळवून पाइप लाइन देखील टाकण्यात येईन असे मान्य केले आहे.आदिवासी भिल्ल वस्तीकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष -- अतुल पाटील. बोरावल गेट भागांतील सखाराम भिल्ल, चेतन भिल्ल या बांधवांनी माझी भेट घेऊन ते रहात असलेल्या शांती नगर भागात भेट देऊन पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केल्याने आम्ही कार्यकर्त्यांसह पाहणी केली असता समस्यांचा पाढा तेथील रहिवासी यांनी वाचला. दिवाबत्ती, गटार साफसफाई, नळ जोडणी, शौचालय, रस्ता या पैकी एकही सुविधा त्या भागातील रहिवासी यांना मिळत नाही म्हणून नागरिक त्रस्त आहेत नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असुन त्यांना तत्काळ वरील सुविधा देण्यात याव्यात यासाठी आग्रही भूमिका घेणार असुन कामे मार्गी न लागल्यास वेळ प्रसंगी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात येईल.यावेळी किशोर माळी,नरेंद्र शिंदे,भुषण खैरे, सखाराम भिल्ल, चेतन भिल्ल, इ कार्यकर्ते हजर होते.

आदिवासी भिल्ल वस्तीची पाहणी करून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सोडविल्या समस्या.                  
Previous Post Next Post