**७६ वा प्रजासत्ताक दिन , नेताजी सुभाष विद्यालयात मोठ्या ऊत्साहात साजरा.**नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते ध्वजारोहन*. (प्रतिनिधी / अनिल चव्हाण.)——————————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या वतीने देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या वतीने २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात *प्रेरणा अंका* चे प्रकाशन करण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत , प्रा डाॅ. शिवराज नाईक पर्यवेक्षक उध्दवराव हरकाळ यांच्या मार्गदर्शनाखाले बालवाडी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांची शहरातील विसर्जन मार्गाने भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध संघटनेच्या वतीने शालेय मूलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तर काही सामाजीक संघटनानी शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.प्रभात फेरीतील शालेय मुलांनी विविध वेशभूषा करून विविधता मै एकता चा संदेश दिला. तर शहरात भारत माता की जय , वंदे मातरम् .. जोडो जोडो भारत जोडो अशा घोषणा दिल्या प्रभात फेरी शहरातील छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक, पूण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर चौक, पोलिस स्टेशन मेन रोड स्व. झूंबरलालजी पल्लोड चौक, मंत्री चौक, संत सेना महाराज चौक, संत सावतामाळी चौक, मोठा मारोती मंदीर , विठ्ठल मंदीर चौक, दत्त मंदीर चौक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सभागृह चौक , कृष्ण मंदीर चौक , कूर्हाडे गल्ली चौक , पेठ मोहल्ला चौक , गूजरी चौक , क्राॅंति चौक, लाड गल्ली, नारायण नगर, राम मंदीर परिसर, नाटकेश्वर मंदिर चौक ,तलाबकट्टा चौक, स्वामी दिव्यानंदजी उद्यान, एकता नगर , कैलास नगर शिवाजी नगर मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. विविध देखावे, वेशभूषा व भारत मातेचा जयघोष यामूळे प्रभात फेरी विशेष लक्षणीय ठरली.प्रभात फेरी नंतर विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.या वेळी शहरातील विकास पूरूष डाॅ. अकूशरावजी लाड , यांच्या सह सेवानिवृत्त शिक्षक, सामाजीक कार्यकर्ते , समाज सेवक , आजी माजी नगर सेवक, लोकप्रतिनिधी, विविध संघटनेचे पदाधिकारी, डाॅक्टर , वकील, शिक्षणप्रेमी नागरिक, युवक यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील आजी माजी शिक्षक बांधवासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले शालेय मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.*
byMEDIA POLICE TIME
-
0